Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

रत्नागिरी : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई; नाटे येथील ₹2.91 लाखांच्या घरफोडीचा गुन्हा उघड, दोन आरोपी अटकेत

banner 468x60

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने नाटे येथील घरफोडीचा गुन्हा यशस्वीरीत्या उघडकीस आणत दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ₹2.66 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 4 ते 5 मार्च 2026 दरम्यान नाटे येथील यश होम स्टेच्या पाठीमागील बाजूस श्री. शहाणे यांच्या घरात भाड्याने राहणारे रोशन मोठाभाऊ बच्छाव (वय 27, मूळ रा. चिचावड, ता. मालेगाव, जि. नाशिक) हे कामानिमित्त बाहेर गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खोलीच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बॅगेतील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ₹2.91 लाखांचा ऐवज चोरून नेला.

या प्रकरणी नाटे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 25/2026 भारतीय न्यायसंहिता 2023 च्या कलम 305(अ) व 331(3)(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली नाटे पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची विशेष तपास पथके तयार करण्यात आली.

तपासादरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळालेल्या गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे 28 जुलै 2026 रोजी विकास टीपू पवार (वय 23) आणि संपत बिल्लू पवार (वय 20) या दोघांना कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथून ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान दोघांनीही सदर घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली.

आरोपींकडून चोरीतील ₹1.91 लाख किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटारसायकल असा एकूण ₹2.66 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी नाटे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, पोलीस हवालदार विजय आंबेकर, दिपराज पाटील, योगेश नार्वेकर तसेच पोलीस कॉन्स्टेबल अतुल कांबळे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *