Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दापोली : तुटलेल्या वीजवाहिनीचा शॉक, दोन गाईंचा जागीच मृत्यू

banner 468x60

दापोली तालुक्यातील पिसई गावात तुटलेल्या विद्युतवाहिनीचा शॉक लागून दोन गाभण गाईंचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (२८ जुलै) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिसई गावातील स्मशानभूमी परिसरात श्री. नारायण भिकू मोरे हे आपली गुरे चरावयास घेऊन गेले होते. गुरे चरत असताना वीजेच्या खांबावरील एक विद्युतवाहिनी तुटून जमिनीवर पडलेली होती. याच तारेच्या संपर्कात आल्याने दोन गाभण गाईंचा जागीच मृत्यू झाला.

गाई मोठ्याने ओरडू लागल्याने. मोरे घटनास्थळी धावले. मात्र त्यांनी सावधगिरी बाळगत गाईंच्या जवळ हात न लावता तत्काळ ग्रामस्थांना माहिती दिली. त्यानंतर स्थानिक नागरिक अजित एसरे यांनी तातडीने डीपीवरील फ्यूज काढून वीजपुरवठा बंद केला. त्यामुळे पुढील मोठी दुर्घटना टळली.

या घटनेत मृत झालेल्या दोन गाभण गाईंची किंमत सुमारे ₹15,000 इतकी असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती पिसईचे पोलीस पाटील, सरपंच, महावितरणचे वायरमन व संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

पंचनामा व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर गाईंचे मृतदेह मालकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून तुटलेल्या विद्युतवाहिन्यांबाबत महावितरणने तातडीने खबरदारी घेण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *