Breaking News
दापोली : मद्यधुंद कारचालकाची पादचाऱ्यांना धडक, दोघे गंभीर जखमी, कुंभवे शिगवणवाडी येथील घटना देवरुख : आंबव येथे रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळला तरुण, उपचारादरम्यान मृत्यू, फिटचा झटका आल्याने डोक्याला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती रत्नागिरीच्या कोकणनगरमध्ये घरफोडी, 4 लाख 72 हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास संगमेश्वर : कडवई प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात, धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत संगमेश्वर : नाणीज येथे प्रवासादरम्यान प्रकृती बिघडली, 28 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, मावस बहिणीच्या साखरपुड्यासाठी गेला होता कुटुंबासोबत

चिपळूण : वर्षभर उलटले, तरी सावर्डे बसस्टॉपची दुरवस्था कायम, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सावर्डे बसस्टॉप धोकादायक

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील महत्त्वाचे सावर्डे बसस्टॉप परिसरात सुमारे वर्षभरापूर्वी झालेल्या लक्झरी बसच्या भीषण अपघातात बसथांबा शेड, स्ट्रीट लाईटचा पोल आणि परिसरातील इतर संरचनांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, अपघाताला एक वर्षाहून अधिक कालावधी उलटूनही नुकसानग्रस्त शेड व पोलची दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने नागरिक आणि प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

अपघातात बसथांब्याचे लोखंडी पत्रे वाकून धोकादायक अवस्थेत लोंबकळत आहेत. अनेक ठिकाणी गंजलेले लोखंड बाहेर आले असून पादचारी व प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. बसस्टॉप परिसरातील स्ट्रीट लाईटचा पोलही अद्याप उभारण्यात आलेला नसल्याने रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरते. त्यामुळे नागरिकांना तसेच प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
सावर्डे ही परिसरातील अनेक गावांची प्रमुख बाजारपेठ असून दररोज शेकडो नागरिक, विद्यार्थी आणि प्रवासी या बसथांब्याचा वापर करतात. अशा ठिकाणी मोडकळीस आलेली संरचना कायम असल्याने अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.


स्थानिक नागरिकांनी संबंधित विभागाने तातडीने नुकसानग्रस्त शेड हटवून नवीन बसथांबा उभारावा, तसेच स्ट्रीट लाईट व्यवस्था पूर्ववत करावी अशी मागणी केली आहे. अन्यथा एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *