Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दापोली : स्वच्छतेसाठी कडक पावले, उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, दापोली युथ अलायन्सचा पुढाकार

banner 468x60

दापोली शहरातील वाढती अस्वच्छता आणि उघड्यावर कचरा टाकण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी दापोली युथ अलायन्स आणि दापोली नगरपंचायत यांनी संयुक्तपणे महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. शहरातील विविध ठिकाणी “येथे कचरा टाकू नये” असे इशारा देणारे फलक लावण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कडेला आणि सार्वजनिक जागांमध्ये कचरा टाकला जात असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असून परिसराच्या सौंदर्यावरही विपरीत परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर दापोली युथ अलायन्सच्या तरुणांनी नगरपंचायतीच्या सहकार्याने स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली आहे.

या मोहिमेअंतर्गत शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि कचरा टाकला जाणाऱ्या संभाव्य ठिकाणी चेतावणी फलक लावण्यात आले आहेत. या फलकांवर “येथे कचरा टाकू नये. कचरा टाकताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

युवकांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून फलक लावण्याबरोबरच नागरिकांचे प्रबोधनही सुरू केले आहे. घरातील कचरा उघड्यावर न टाकता नगरपंचायतीच्या घंटागाडीत किंवा अधिकृत कचराकुंडीतच टाकावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

या संयुक्त उपक्रमाचे स्थानिक नागरिकांकडून स्वागत होत असून, यामुळे दापोली शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दापोलीला हरित व स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने प्रशासन आणि स्वयंसेवकांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *