Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

शक्ती-तुरा शाहिरी परंपरेचे बादशहा शाहीर रामचंद्र हरी घाणेकर बुवा यांचे निधन, शाहिरी क्षेत्रावर शोककळा

banner 468x60

शक्ती-तुरा शाहिरी परंपरेतील ज्येष्ठ शाहीर, खंदे शिलेदार आणि रसिकांच्या मनावर आपल्या प्रभावी शाहिरीने अधिराज्य गाजवणारे शाहीर रामचंद्र हरी घाणेकर (बुवा) यांचे आज, दि. २१ जुलै २०२६ रोजी त्यांच्या पढवण येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच शाहिरी क्षेत्र, लोककला प्रेमी आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

कोकणातील शक्ती-तुरा शाहिरी परंपरेचे एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून शाहीर रामचंद्र हरी घाणेकर बुवा यांची ओळख होती. आपल्या ओजस्वी आवाजाने, प्रभावी सादरीकरणाने आणि पारंपरिक शाहिरीची समृद्ध परंपरा जपत त्यांनी अनेक दशके लोककलेची अखंड सेवा केली. त्यांच्या कार्यक्रमांना राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असे. त्यांनी अनेक तरुण शाहिरांना मार्गदर्शन करून शाहिरीची परंपरा पुढील पिढीकडे पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

शक्ती-तुरा परंपरेतील त्यांचे योगदान अतुलनीय मानले जाते. त्यांच्या शब्दांमधील ताकद, सामाजिक भान आणि लोकजागृतीचा संदेश यामुळे त्यांनी असंख्य रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. त्यामुळेच त्यांना प्रेमाने “शक्ती-तुराचे बादशहा” म्हणून ओळखले जात होते.

त्यांच्या निधनामुळे शक्ती-तुरा शाहिरी परंपरेचे मोठे सांस्कृतिक नुकसान झाले असून, ही उणीव दीर्घकाळ जाणवत राहील, अशी भावना शाहिरी क्षेत्रातील कलाकार आणि रसिक व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावरही अनेक मान्यवर, कलाकार आणि चाहत्यांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

शाहीर रामचंद्र हरी घाणेकर बुवा यांच्यावर आज, दि. २१ जुलै २०२६ रोजी दुपारी २ वाजता त्यांच्या मूळ गावी पढवण येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंतिम दर्शनासाठी नातेवाईक, मित्रपरिवार, शाहिरी क्षेत्रातील कलाकार आणि असंख्य चाहते उपस्थित राहणार आहेत.

ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना तसेच चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच भावपूर्ण प्रार्थना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *