मंडणगडमध्ये कौटुंबिक वादातून चुलती आणि मुलावर हल्ला, चुलत पुतण्यांविरुद्ध गुन्हा दाखल

banner 468x60

मंडणगड तालुक्यातील शिगवण गावात कौटुंबिक वादातून एका ७० वर्षीय महिलेसह तिच्या मुलावर हल्ला झाल्याची घटना घडली असून, या प्रकरणी मंडणगड पोलिस ठाण्यात दोन चुलत पुतण्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २६ जून रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास शिगवण येथे घडली. फिर्यादी राजेश्री शिवाजी जगताप (वय ७०) या आणि आरोपी हे नात्याने चुलती व चुलत पुतणे असून, एकाच घरात वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहत आहेत.

फिर्यादीनुसार, आरोपी विश्वनाथ मनोहर जगताप याने विनाकारण वाद घालत फिर्यादींचा मुलगा किशोर शिवाजी जगताप याला शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर लाकडी बॅटने राजेश्री जगताप यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर वार करून त्यांना दुखापत केली. या मारहाणीत त्यांच्या हातातून रक्तस्राव झाला.

दरम्यान, वाद सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या किशोर जगताप यांना आरोपी विनय मनोहर जगताप याने ढकलल्याने ते खाली पडले. पडताना त्यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूस कानाजवळ दगड लागून ते जखमी झाले. तसेच दोन्ही आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या मुलाला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी मंडणगड पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७४/२०२६ नोंद करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ३५१(२), ३५२ आणि ३(५) अन्वये दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मंडणगड पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *