Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

दाभोळ : दाभोळमध्ये ‘कै. डॉ. मधुकर भिकाजी लुकतुके रुग्णोपयोगी साहित्य केंद्राचं आज उद्घाटन

banner 468x60

कै. कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठान संचलित ‘कै. डॉ. मधुकर भिकाजी लुकतुके रुग्णोपयोगी साहित्य केंद्र, दाभोळ’ या महत्त्वपूर्ण समाजोपयोगी उपक्रमाचा उद्घाटन समारंभ आज, शुक्रवार दि. २६ जून २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकमान्य टिळक स्मारक संस्था, दाभोळ (हायस्कूल ग्राउंड) येथे संपन्न होणार आहे.

banner 728x90

या केंद्राच्या माध्यमातून विविध रुग्णोपयोगी साहित्य गरजू रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येणार असून, परिसरातील नागरिकांसाठी हा उपक्रम मोठा दिलासादायक ठरणार आहे. सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यसेवेच्या क्षेत्रात योगदान देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

उद्घाटन समारंभाला महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री योगेश कदम प्रमुख उपस्थित म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिपिन पाटणे, कार्यवाह गंगाराम इदाते आणि उपाध्यक्ष मिहीर महाजन यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. आनंद गोंधळेकर, रोहन तोडणकर, राहुल गोंधळेकर, पंकज पालकर, ओंकार कात्रे, दीपक कुटरेकर, किरण फडणीस, दीप कुडाळकर, नितीन यादव, विनय पारदळे, रोहन यादव, समीर नवजेकर, संदेश साळवी, निकेश जाडे, सागर शिंदे, सुनिल पाते, कौस्तुभ वैद्य, विठ्ठल बाईत आणि किशोर तांबडे यांचा समावेश असलेल्या व्यवस्था समितीने विशेष परिश्रम घेतले आहेत.

प्रतिष्ठानतर्फे दाभोळ व परिसरातील नागरिकांना उद्घाटन समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समाजहिताच्या या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना आवश्यक वैद्यकीय साहित्य सहज उपलब्ध होण्यास मदत होणार असून, आरोग्यसेवेच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *