Breaking News
चिपळूण : झाडावरून पडून जखमी झालेल्या चिपळुणातील 60 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू चिपळूण : सावर्डेतील मंगल कार्यालयातून 1 लाख 87 हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला, लग्नसोहळ्यात चोरट्यांचा डाव! चिपळूण : 38 वर्षीय तरुणाचा खोलीत मृतदेह आढळला, दोन दिवसांपासून होता घरातच रत्नागिरी : स्वच्छ सर्वेक्षणात रत्नागिरीचा देशात डंका, देशात पटकावला तिसरा क्रमांक, स्वच्छतेच्या राष्ट्रीय स्पर्धेत रत्नागिरीची दमदार कामगिरी रत्नागिरी : स्वप्नाली सावंत हत्या प्रकरणात पती सुकांतसह नोकराचा जामीन अर्ज फेटाळला; रत्नागिरी सत्र न्यायालयाचा निर्णय, चार वर्षांहून अधिक काळ कारागृहात

दाभोळच्या जि.प. कन्या शाळेत उत्साहात प्रवेशोत्सव, चिमुकल्यांचे उत्साहात स्वागत

banner 468x60

नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी जि.प. कन्या शाळा, दाभोळ येथे शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थिनी, पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी प्रभातफेरीने झाली. त्यानंतर नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थिनींचे औक्षण करून त्यांचे गुलाबपुष्प व चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. शाळेत येणाऱ्या चिमुकल्यांचे पहिले पाऊल उत्साहात घेण्यात आले.

या प्रसंगी उंबरे केंद्राच्या केंद्रप्रमुख शुभांगी शिगवण, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष शशिकांत भिकू राणे, शिक्षणतज्ज्ञ प्रशांत दिनकर यादव, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थिनींना गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष शशिकांत भिकू राणे यांनी सर्व विद्यार्थिनींना पेन आणि पेन्सिल भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मध्यान्ह भोजनात विद्यार्थिनींना मटार पुलाव व जिलेबी देण्यात आली. विविध उपक्रमांमुळे विद्यार्थिनींमध्ये शाळेविषयी उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करत दाभोळ येथील जि.प. कन्या शाळेचा प्रवेशोत्सव सोहळा उत्साहात आणि आनंददायी वातावरणात पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *