Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

चिपळूण : खिडकी तोडून घरफोडी, सती नाका येथे 1.4 लाखांचा ऐवज लंपास

banner 468x60

चिपळूण शहरातील सती नाका परिसरात असलेल्या एका रेफ्रिजरेशन दुकानात अज्ञात चोरट्यांनी खिडकी तोडून घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली असून व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. या चोरीत सुमारे १ लाख ४ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.

banner 728x90

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रदीप काशिनाथ कदम (वय ४५, रा. वेहळे कदमवाडी) यांचे सती नाका येथे “श्री सुकाई रेफ्रिजिरेशन” नावाचे दुकान आहे. दिनांक ३ मे रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ४ मे रोजी सकाळी ९ वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या खिडकीचे गज तोडून आत प्रवेश केला.

यानंतर चोरट्यांनी दुकानातील विविध मौल्यवान साहित्य लंपास केले. यात सुमारे १७ हजार रुपये किमतीचा कॉम्प्रेसर, २५ हजार रुपयांचे एसी व फ्रिज सर्व्हिसिंग टूलकिट, डीप फ्रीजची कुलिंग कॉईल, ब्लोवर, सर्व्हिस पंप, वॉशिंग पाईप, ड्रिल मशीन तसेच सुमारे ३० हजार रुपये किमतीचे तांब्याच्या पाईपचे तुकडे असा एकूण १.०४ लाख रुपयांचा माल चोरीला गेला आहे.

घटनेची माहिती मिळताच फिर्यादी यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३३१(२), ३३१(४) आणि ३०५ प्रमाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक १३०/२०२६ दाखल केला आहे.

या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ‘ई-साक्ष’ ॲपच्या माध्यमातून पुरावे संकलित करण्यास सुरुवात केली असून अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलिसांनी रात्री गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *