Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

चिपळूण : महाराष्ट्र दिनी चिपळूणमध्ये भव्य मोफत महाआरोग्य शिबिर; 117 नागरिकांना लाभ, 1300 वे शिबिर ठरले विशेष आकर्षण

banner 468x60

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधत दि. चिपळूण अर्बन को-ऑपरेटिव्ह प्रा. लि. बँक, चिपळूण यांच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. लाईफ केअर हॉस्पिटल, उपजिल्हा रुग्णालय कामथे तसेच NAB आय हॉस्पिटल, चिपळूण यांच्या संयुक्त सहकार्याने हे शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले.

banner 728x90

आरोग्यसेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी आणि ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना तज्ञ डॉक्टरांची सेवा मोफत मिळावी या उद्देशाने आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकाच ठिकाणी विविध आजारांवर तपासणी व उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.

या शिबिरात तज्ञ डॉक्टरांकडून ईसीजी, रक्तदाब, मधुमेह तपासणी, कर्करोग तपासणी, अस्थमा (दम्याचे आजार), महिलांची विशेष तपासणी, काना-घसा तपासणी तसेच डोळ्यांची तपासणी करण्यात आली. याशिवाय आवश्यकतेनुसार इंजेक्शन, सलाईन व औषधोपचार मोफत देण्यात आले. गंभीर स्वरूपाच्या काही रुग्णांची पुढील तपासणी व शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली.


या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी रुग्णसेवक व समाजसेवक शशिकांत मारुती चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले. अत्यंत कमी वेळेत नियोजन करून त्यांनी हे शिबिर यशस्वीपणे पार पाडले. गेल्या १५ वर्षांपासून सुरू असलेल्या त्यांच्या रुग्णसेवेतील हे १३००वे शिबिर ठरले, ही बाब उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरली.

या उल्लेखनीय कार्याबद्दल बँकेचे चेअरमन सन्माननीय मोहन यांनी शशिकांत चव्हाण यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले. त्यांच्या सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाची प्रशंसा करत पुढील काळातही असेच उपक्रम राबवावेत, अशा शुभेच्छा त्यांनी व्यक्त केल्या.

या प्रसंगी चिपळूण अर्बन बँकेचे अध्यक्ष मोहनशेठ मिरगल, उपाध्यक्ष धनंजय खातू, माजी अध्यक्ष सतीश अप्पा खेडेकर, संचालक ऍड. दिलीप उर्फ भाऊ दळी,. समीर जाणनवलकर,. सुनिल खेडेकर,
. रत्नदीप देवळेकर,. विराज दळी, चिफ ऑफिसर . अरविंद भागडे,. नितीन चिंगळे, प्रशासन अधिकारी. समीर जंगम तसेच बँकेचा अधिकारी, कर्मचारी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

या शिबिरामध्ये एकूण ११७ नागरिकांनी लाभ घेतला. शिबिराला बँकेचे संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजोपयोगी उपक्रमामुळे परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *