Breaking News
लांजा-दाभोळे मार्गावर पिकअपमधून दोन बैलांची वाहतूक, 2.71 लाखांचा मुद्देमाल जप्त रत्नागिरी : ‘एक लाख भरा, एक कोटी कर्ज घ्या’चे आमिष; 40 ते 45 नागरिकांची फसवणूक झाल्याचा आरोप,1 टक्का व्याजदराचे आमिष; ऑनलाइन लाखो रुपयांची देवाणघेवाण लांजा : ‘आजी, पुढे सोडतो’ म्हणत दुचाकीवर बसवले; घराच्या गेटवर पोहोचताच ‘फोटो काढतो’ सांगून दागिने लंपास, लिफ्ट देण्याच्या बहाण्याने मंगळसूत्र हिसकावले चिपळूण : जागतिक हृदय दिनानिमित्त विशेष आरोग्य शिबिर, अपरांत हॉस्पिटल येथे जागतिक हृदय दिनानिमित्त चिपळूणात 99 रुपयांत कार्डियाक रिस्क असेसमेंट शिबिर दापोली : जमीन घोटाळा? 621 गुंठे वक्फ जमीन व्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करा, चौकशी पूर्ण होईपर्यंत बांधकाम आणि तृतीय पक्षाला हस्तांतरणास स्थगिती देण्याची मागणी, जाकीर शेकासन यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे तक्रार

शृंगारतळी : डाव सुरू झाला आणि पोलीस आले, बाजारपेठेत कल्याण मटका जुगारावर धाड, आरोपीकडून रोख रक्कम व साहित्य जप्त

banner 468x60

गुहागर तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठ परिसरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या कल्याण मटका जुगारावर पोलिसांनी धाड टाकत एका आरोपीला ताब्यात घेतले. ही कारवाई गुरुवार, दि. ३० एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.४६ वाजता टपरीच्या आडोशाला करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला या ठिकाणी जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला असता, आरोपी सुभाष सयाजी कोंडविलकर (वय ४१, रा. जानवळे, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) हा बेकायदेशीररित्या ‘कल्याण मटका’ जुगार चालवत असल्याचे निदर्शनास आले.

या वेळी पोलिसांनी आरोपीला रंगेहात पकडले. त्याच्याकडून एकूण १,४७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यामध्ये १,४७० रुपयांची रोख रक्कम तसेच जुगार खेळण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य यांचा समावेश आहे.

या प्रकरणी गणेश राजेंद्र सावंत (वय ३७, पोहेकॉ/३०६, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून गुहागर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२ (अ) नुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक ३०/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या कारवाईमुळे शृंगारतळी बाजारपेठ परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार व्यवसायाला आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली असून, या प्रकरणाचा अधिक तपास गुहागर पोलीस करत आहेत.

Responses (3)

  1. Чтобы оценить мужское репродуктивное здоровье, можно спермограмма в специализированной лаборатории.
    Накануне исследования лучше не перегружать организм интенсивными тренировками.

    Как проходит сдача материала

    Перед началом процедуры необходимо вымыть руки и наружные половые органы.

    Что оценивает лаборатория

    При необходимости врач назначает повторную сдачу через определенный промежуток времени.

    Как понять полученные результаты

    После получения бланка анализа желательно обратиться за консультацией к урологу или андрологу.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *