Breaking News
दापोली : दापोलीत मोठा जमीन घोटाळा? वक्फ जमिनींच्या व्यवहारांना वक्फ मंडळाची नोटीस, वक्फ जमिनींच्या व्यवहारांचा पर्दाफाश होणार? सत्ताधारी पक्षाच्या नेत्याच्या कनेक्शनमुळे प्रकरण चर्चेत, 44 जणांना नोटीस, 7 दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश रत्नागिरी : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची चौथ्या मजल्यावरून उडी, पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा, ‘माहेरून फ्लॅट घेण्यासाठी पैसे आणावेत, अन्यथा मुलाचा दुसरा विवाह करून देऊ’, मुलांपासून दूर ठेवल्याचा तक्रारीत आरोप पाच सागरी जिल्ह्यांतील भूमिपुत्रांची एकजूट, ‘सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना रत्नागिरी : ज्येष्ठ पत्रकार जावेद मुजावर यांचे निधन,पत्रकारिता, सहकार क्षेत्रात हळहळ धक्कादायक खेडमध्ये दोन तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल

कोकण कन्या एक्सप्रेसमध्ये अवैध मद्यसाठा जप्त; परिचारक रंगेहाथ पकडला

banner 468x60

रत्नागिरी येथे कोकण रेल्वे मार्गावरील गाडी क्रमांक ११००४ कोकण कन्या एक्सप्रेसमध्ये अवैध मद्यसाठ्याची तस्करी उघडकीस आली असून, वातानुकूलित डब्यातील एका परिचारकाला रेल्वे संरक्षण दलाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई रत्नागिरी रेल्वे स्थानकावर करण्यात आली.

तपासणीदरम्यान संशयावरून संबंधित परिचारकाची झडती घेण्यात आली असता त्याच्याकडे बेकायदेशीररीत्या नेल्या जात असलेल्या तब्बल ३५ दारूच्या बाटल्या आढळून आल्या. या प्रकरणामुळे रेल्वे प्रशासनात खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे, या प्रकरणात रेल्वे कर्मचाऱ्याचाच सहभाग आढळल्याने प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. संबंधित परिचारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रशासन सतत दक्ष असून, कोणत्याही प्रकारच्या प्रतिबंधित वस्तू सोबत न बाळगण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वे संरक्षण दलाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *