Breaking News
दापोली : मद्यधुंद कारचालकाची पादचाऱ्यांना धडक, दोघे गंभीर जखमी, कुंभवे शिगवणवाडी येथील घटना देवरुख : आंबव येथे रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळला तरुण, उपचारादरम्यान मृत्यू, फिटचा झटका आल्याने डोक्याला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती रत्नागिरीच्या कोकणनगरमध्ये घरफोडी, 4 लाख 72 हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास संगमेश्वर : कडवई प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात, धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत संगमेश्वर : नाणीज येथे प्रवासादरम्यान प्रकृती बिघडली, 28 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, मावस बहिणीच्या साखरपुड्यासाठी गेला होता कुटुंबासोबत

खेड : मानसिक तणावातून पेटवून घेत तरुणाची आत्महत्या

banner 468x60

मानसिक तणावातून एका व्यक्तीने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतल्याची दुर्दैवी घटना खेड तालुक्यातील कोरेगाव बेलवाडी येथे घडली आहे.

उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र बाळकृष्ण शिंदे (वय ४८, रा. कोरेगाव बेलवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची मानसिक स्थिती ठीक नव्हती. त्यांना नीट झोप लागत नव्हती आणि ते तणावाखाली होते.


१८ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास त्यांच्या घरातील लोक झोपलेले असताना, रवींद्र यांनी घरात मोटर सायकलसाठी आणून ठेवलेलं पेट्रोल स्वतःच्या अंगावर ओतून घेतलं आणि पेटवून घेतलं. यामध्ये ते गंभीररीत्या भाजले.


घरच्यांनी त्यांना तात्काळ कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्याचा निर्णय घेण्यात आला. खेड ते संगमेश्वर प्रवासादरम्यानच रुग्णवाहिकेत त्यांचा मृत्यू झाला.


त्यानंतर मृतदेह संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर संगमेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद (अ.मृ.क्र. ००/२०२५) केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *