Breaking News
रत्नागिरी : गोखले नाका परिसरात वृद्धाचा चक्कर येऊन मृत्यू रत्नागिरी : जिल्ह्यातील मंडणगड, दापोली व खेड येथील पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतींसाठी शासनाची मंजुरी 30 कोटींच्या निधीस मंजुरी; ग्रामीण प्रशासन अधिक सक्षम करण्याचा निर्णय – राज्यमंत्री योगेश कदम दापोली : 7/12 उताऱ्यावर नाव नोंद करण्यासाठी 10 हजारांची लाच घेताना ग्राम महसूल अधिकारी (तलाठी)ला रंगेहात अटक, लाच घेण्यात महिला अधिकारीही मागे नाहीत, सततच्या लाच मागणीला कंटाळून तक्रार दाखल रत्नागिरी : पोलीस असल्याचे सांगून वृद्ध महिलेची सोन्याची चेन लुटली खेड : पंचायत समिती कार्यालयात हृदयविकाराचा झटका, चिपळूण येथील शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू

रत्नागिरी- कराड एसटी बससेवा ठप्प; प्रवाशांचे हाल

banner 468x60

रत्नागिरी- कराड एसटी बससेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल सुरू झाले आहेत.
कराड, फलटण, पुसेगाव, म्हसवड, गोंदवले, दहिवडी, वडूज, पुसेसावळी, रहीमतपूर, कोरेगाव या भागांतून रत्नागिरी, राजापूर, लांजा, साखरपा, पावस, कोकरूड या भागात जाणाऱ्या एसटी बसेस गेल्या काही महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

banner 728x90 banner 728x90


खाजगी वाहनचालकांकडून अवाजवी भाडे आकारले जात असून, गाड्या पूर्ण भरेपर्यंत उभ्या ठेवल्या जातात. वयोवृद्ध व रुग्णांना याचा विशेष त्रास होतो. कराडमधील रुग्णालयात मोफत उपचारासाठी कोकणातून येणाऱ्या रुग्णांनाही बससेवेच्या अभावामुळे मोठा अडथळा निर्माण झाला आहे.


आरोग्याच्या दृष्टीनेही या बससेवेचे महत्त्व अधोरेखित होते. कराडमधील रुग्णालयात मेंदू, मणका, हृदय, किडनी, कॅन्सर तसेच अपघातग्रस्त रुग्णांचे मोफत उपचार केले जातात. रत्नागिरी, पावस, गणपतीपुळे, लांजा, राजापूर, देवरुख, संगमेश्वर यांसारख्या भागांतून उपचारासाठी कराड येथे येणाऱ्या रुग्णांना बससेवेच्या अभावामुळे प्रचंड अडचण होते.


बससेवा नसल्याने प्रवाशांना कोल्हापूर मार्गे मोठा वळसा घालून यावे लागते, त्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाढतात. शेडगेवाडी मार्गे थेट रत्नागिरीला जाता येऊ शकते; मात्र कराड–शेडगेवाडी बसेस उपलब्ध असूनही पुढे मलकापूरकडे जाणाऱ्या बसेस मिळत नाहीत.

प्रवाशांनी रत्नागिरी, लांजा, राजापूर, देवरुख आगारातून किमान एक तरी नियमित बससेवा तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *