नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित एस. एम. जोशी विद्यानिकेतन, रत्नागिरी येथे मागील ४३ वर्षांची परंपरा असलेली कै. मृणाल हेगशेट्ये स्मृतिदिन जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा यंदा अत्यंत उत्साहात आणि दणक्यात पार पडली.
या नामांकित स्पर्धेत जिल्ह्यातील नामवंत महाविद्यालयीन तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील ३० पेक्षा जास्त शाळांनी सहभाग नोंदविला होता.
या स्पर्धेतील जिल्हास्तरीय माध्यमिक गटामध्ये संतोषभाई मेहता इंग्लिश मिडियम स्कूल, दापोली येथील इयत्ता ९ वीची विद्यार्थिनी कु. जान्हवी काशीराम देवघरे हिने इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत प्रभावी ठसा उमटवत प्रथम क्रमांक मिळविला.
तिच्या भाषणाचा विषय होता –
“We Are On The Verge Of World War III!”
या गंभीर व समकालीन विषयावर तिने केलेली आत्मविश्वासपूर्ण व नेमकी मांडणी परीक्षक मंडळींसह प्रेक्षकांच्याही मनाला भिडली.
या यशामागे विद्यार्थिनीचे परिश्रम, आणि शाळेच्या मुख्याध्यापिका चंदाली पारकर, शिक्षिका सौ.नंदिनी लेंढे, सौ.नुरेन वाकणकर यांचे मार्गदर्शन लाभले.ज्ञानदीप दापोलीच्या अध्यक्षा सरोजताई मेहता, संस्थेचे सेक्रेटरी श्री सुजय मेहता यांनी तिचे कौतुक केले जान्हवीचे हे यश केवळ शाळेसाठीच नव्हे तर संपूर्ण दापोली तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















