रत्नागिरी : इलेक्ट्रिकल्स दुकानातून साडेचार लाखांची चोरी

banner 468x60

रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरातील एका इलेक्ट्रिकल्स दुकानात काम करणाऱ्या कामगाराने मालकाची तब्बल ४ लाख ६७ हजार रुपयांची रक्कम गहाळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.


परेश महादेव बापर्डेकर (३०, रा. कातळवाडी कोंडये, ता. लांजा) असे संशयिताचे नाव असून, दुकानातील साहित्य विक्रीतून आलेली व इतर दुकानदारांकडून मिळालेली रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.


दुकानाचे मालक अमरेश सुरेश पावसकर (४२, रा. माळनाका, रत्नागिरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, डिसेंबर २०२४ ते १ ऑगस्ट २०२५ या कालावधीत परेश हा त्यांच्या इलेक्ट्रिकल्स दुकानात कार्यरत होता. या काळात विक्रीतून जमा होणारी रक्कम तसेच वितरित साहित्याची देय रक्कम कार्यालयात न जमा करता तो स्वतःकडेच ठेवत असल्याचा आरोप मालकाने केला आहे.


शहर पोलिसांनी तपासानंतर परेश याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४०८ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *