आंब्याच्या झाडाला गळफास लावून २२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११.१५ वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील मठ येथे उघडीस आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची खबर राजेश शांताराम मठकर (वय ४४, रा.मठकरवाडी, मठ, ता.लांजा) यांनी लांजा पोलिसांनी दिली.
त्यांचा मुलगा भूषण राजेश मठकर (वय २२, रा.मठकरवाडी, मठ, ता.लांजा) हा घरातील गणपतीची हातगाडी ही वरच्या घरी ठेवून येतो असे सांगून शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घरातून निघून गेला होता. मात्र तो घरी न परतल्याने तसेच त्याच्या मोबाईलवर संपर्क होत नसल्याने वडील राजेश मठकर यांनी शनिवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पुन्हा मुलगा भूषण याच्या मोबाईलवर कॉल केला असता तो कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर दाखवत होता.
दरम्यान, शनिवारी सकाळी ११.१५ वाजण्याच्या सुमारास मठ येथील भवानी सोमेश्वर मंदिराचे पुजारी यांनी गावातील सुभाष पवार यांना फोन करुन भूषण हा मंदिराच्या शेजारी असलेल्या तळी जवळील आंब्याच्या झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत लटकत असल्याचे सांगितले. त्यानंतर घटनास्थळी पाहणी केली असता भूषण हा नायलॉन दोरीने गळफास लावून निपचित पडलेला दिसून आला.
याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे हे करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















