चिपळूण : डॉ. सविता दाभाडेयांना राज्यस्तरीय “आदर्श पुरस्कार”

banner 468x60

रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन, दापोली यांच्या वतीने दरवर्षी शिक्षण, वैद्यकीय, पर्यटन, पर्यावरण व सामाजिक कार्य या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय “आदर्श पुरस्कार” प्रदान केला जातो. यंदा हा पुरस्कार चिपळूण येथील सुप्रसिद्ध डेंटिस्ट डॉ.सविता दाभाडे यांना त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल जाहीर झाला आहे.

banner 728x90 banner 728x90


डॉ. सविता दाभाडे या ‘ॐ कार दातांचा दवाखाना’ या अत्याधुनिक दंतचिकित्सालयाच्या संचालिका असून, कोविड काळात अखंड सेवा, 2021 च्या महापुरानंतर पूर्ण महिनाभर मोफत दंत तपासणी व उपचार, शाळा-काॅलेजमध्ये आरोग्य जनजागृतीसाठी प्रेझेंटेशन तसेच मोफत दंत तपासणी अशा अनेक उपक्रमांत त्यांनी मोलाचे कार्य केले आहे.

दरवर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांसाठी नवरात्र उत्सवात घेतली जाणारी ‘बेस्ट स्माईल कॉन्टेस्ट’ ही स्पर्धा त्यांचीच संकल्पना आहे.


सामाजिक बांधिलकी जपत त्या लायन्स क्लब ऑफ चिपळूण गेलेक्सीच्या माध्यमातूनही सक्रिय कार्यरत असून सध्या त्या क्लबच्या सेक्रेटरी म्हणून कार्य पाहत आहेत. नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून कोकणवासीयांना वेदनारहित व आधुनिक उपचार देण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.


हा “आदर्श पुरस्कार” त्यांना रविवार, दि. 28 सप्टेंबर 2025 रोजी पुणे येथे भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे. या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल समाजाच्या सर्व स्तरांतून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *