Breaking News
रत्नागिरी : ऑनलाईन बँकिंग फसवणूक करणारे भामटे गजाआड, साखरी येथील ४.८२ लाखांच्या अपहारप्रकरणी मुसक्या आवळल्या; तांत्रिक तपासाला मोठे यश रत्नागिरी : हातखंबा येथे चार वाहनांची साखळी धडक; ट्रक क्लिनर गंभीर जखमी, महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प रत्नागिरी: कौटुंबिक वादातून विवाहितेची आत्महत्या, उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्या मंडणगड : बामणघरमध्ये जमीन घोटाळा, बाप लोकांनी जमिनीच्या मालकालाच लावला चुना, “पॉवर ऑफ अ‍ॅटर्नीचा गैरवापर, 52 एकर जमीन लाटली, 41 लाखांचा घोटाळा उघड दापोली : एसटी स्टॅन्डजवळ इको गाडीतून बेकायदा दारू वाहतूक पकडली, 2.30 लाखांचा मुद्देमाल जप्त

खेड : वाणीपेठेत पहाटे घराला आग

banner 468x60

खेड शहरातील वाणीपेठ येथील कातळ आळी परिसरात आज पहाटेच्या सुमारास एका घराला आग लागून मोठे नुकसान झाले. सुदैवाने, अग्निशमन दलाच्या तात्काळ कामगिरीमुळे मोठा अनर्थ टळला. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून, घराच्या नुकसानीसह घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.

banner 728x90


ही घटना आज, १२ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटे अंदाजे २.१५ वाजता घडली. वाणीपेठ येथील रहिवासी. किशोर चंद्रकांत विचारे यांच्या दोन मजली कौलारू घराच्या किचनमध्ये अचानक आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, किचनमधील फ्रीजच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे समोर आले आहे.


आगीने लगेचच रौद्र रूप धारण केले आणि ती पसरू लागली. मात्र, याच वेळी घरातील तीन भरलेले गॅस सिलेंडर सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली. आगीच्या धुरामुळे वस्तीमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.


घटनेची माहिती मिळताच खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. फायरमन श्याम देवळेकर, दीपक देवळेकर, वाहनचालक गजानन जाधव यांच्यासह सहाय्यक फायरमन जयेश पवार, प्रणव धाग आणि सुरज शिगवण यांनी अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. त्यांच्या या जलद कामगिरीमुळे आग इतर घरांपर्यंत पसरली नाही आणि वस्तीतील इतर घरांना कोणताही धोका पोहोचला नाही.


या आगीत किचनमधील सर्व साहित्य जळून खाक झाले असून, घराचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांच्या कामगिरीचे परिसरातून कौतुक होत आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *