Breaking News
दापोली : दापोली वक्फ जमीन व्यवहाराला नवे वळण, जमीन व्यवहार प्रकरणी दापोली उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांची बाजू समोर, ‘माझे सर्व कागदपत्रे क्लिअर, वक्फ बोर्डाच्या जमिनीचे खरेदीखत होत नाही, मी जागा पाहून घेतली’ – खालिद रखांगे यांची कोकण कट्टा न्यूजला माहिती राजापूर : गवतात पडलेल्या महावितरणच्या विजेच्या तारेला स्पर्श, शेतकऱ्याचा जागीच मृत्यूमहावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात ग्रामस्थ संतप्त रत्नागिरी : भरधाव ॲक्टिव्हाची महिलेला जोरदार धडक, गंभीर जखमी करून चालक पसार गुहागर : ग्रामदेवतेच्या मंदिरातून 32 हजारांचे दोन अॅम्प्लिफायर चोरीला राजापूर : दिवसा घरफोडी, कुलूप तोडून 12 हजारांचे चांदीचे साहित्य लंपास

लांजा : माचाळ मार्गावर दरड कोसळली

banner 468x60

लांजा तालुक्यात गेली दोन दिवस जोरदार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला आलेल्या माचाळ गावाकडे जाणार्‍या मुख्य रस्त्यावर शुक्रवारी मोठी दरड कोसळल्याने माचाळ गावाचा संपर्क तुटला होता.


माचाळ खिंड येथे तीव्र घाटामध्ये मोठी दरड कोसळल्याने माचाळ पर्यटन क्षेत्राकडे जाणारा रस्ता पूर्णतः ठप्प पडला होता. यामुळे माचाळ व लांजाकडे दोन्ही बाजूनी ये-जा करणारी वाहने घाटात अडकून पडली होती.

आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारपासून लांजा तालुक्यात पाऊस पुन्हा जोरदार सुरू झाला आहे. ऐन गणेशोत्सवात पावसाने हजेरी लावली आहे. अशातच लांजा तालुक्यात शुक्रवारी पडलेल्या जोरदार पावसामुळे दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान माचाळ येथे दरड कोसळली. माचाळ-पालू खिंड येथे ही घटना घडली. दरड कोसळल्यामुळे माचाळ गावचा संपर्क तुटला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *