Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

संगमेश्वर : गुगल मॅपने केला पुन्हा अपघात , 15 दिवसात तिसरा अपघात

Screenshot

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस येथील अवघड वळणावर पुन्हा त्याच ठिकाणी सकाळी 10 वाजता दुसरा अपघात झाला आहे. गोव्याहून वसईकडे जाताना गुगल मॅप द्वारे फुणगुस मार्गे हा ट्रक चालला होता.

banner 728x90 banner 728x90

फुणगुस येथील अवघड वळणार गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाला. सुदैवाने चालकाने गाडीतून उडी मारल्यामुळे जीवितहानी टळली. दोन दिवसापूर्वी याच ठिकाणी केमिकल टँकरचा अपघात झाला होता. 15 दिवसातील हा तिसरा अपघात आहे. वारंवार घडणाऱ्या या अपघाताने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.


सविस्तर वृत्त असे की, पार्लेजी पेपर रॅपिंग रोल घेऊन ट्रक (एम एच 48 जीबी 2930) घेऊन गोव्याहून वसईकडे चालला होता. यामध्ये 7 टन माल होता. फुणगुस येथे आला अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक थेट 30- 40 फूट खोल दरीत कोसळला. यावेळी चालकाने गाडीतून उडी मारल्याने बचावला.

अपघाताच्या मोठ्या आवाजाने ग्रामस्थानी धाव घेतली आणि मदत केली. चालकाला दरीतून वरती आणत पाणी दिले. ग्रामस्थ किरण भोसले, साहीम खान, प्रशांत थुळ, सुभाष लांजेकर, जमीर नाईक, गावातील ग्रामस्थ यांनी मदत केली. 8 दिवसापूर्वी कार दरीत कोसळली होती. त्यानंतर दोन दिवसापूर्वी आयशर टेम्पो कोसळला होता. त्यावेळेला गावातील ग्रामस्थ किरण भोसले आणि साहिल खान दोन दिवस अहोरात्र मेहनत घेतली.

त्यानंतर आज पुन्हा ट्रक दरीत कोसळून मोठे नुकसान झाले आहे.
या अपघाताची माहिती पोलिस पाटील यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्याला दिली असून पोलिस घटनास्थळी रवाना झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *