Breaking News
रत्नागिरी : मुन्ना देसाईंसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा; परशुराम कदम यांच्यावर गुन्हा दाखल लांजा : उत्पादन शुल्कची धडक कारवाई, गोवा बनावटीचा मद्यसाठा व टेम्पोसह 23.63 लाखांचा मुद्देमाल जप्त गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप

दाभोळ : चूल पेटवताना साडीने पेट घेतल्याने महिलेचा मृत्यू

banner 468x60

दाभोळजवळील कोळथरे येथे चूल पेटवताना साडीने पेट घेतल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे.
चूल पेटवत असताना साडीचा पदर चुलीत पडून गंभीर भाजल्याने दापोली तालुक्यातील ६८ वर्षीय वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सुनिता शांताराम फिलसे (वय ६८, रा. कोळथरे, गोलांबडेवाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे.

banner 728x90 banner 728x90


ही दुर्दैवी घटना २१ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. सुनिता फिलसे या आपल्या राहत्या घरी चुलीजवळ बसलेल्या असताना त्यांच्या साडीचा पदर अचानक चुलीतील आगीच्या संपर्कात आला आणि साडीने पेट घेतला.

यात त्या गंभीररित्या भाजल्या.
घटनेची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी तातडीने त्यांना उपचारासाठी दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, २२ जुलै २०२५ रोजी पहाटे ३.५३ वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे कोळथरे आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दाभोळ पोलीस याबाबत पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *