Breaking News
दापोली : दापोलीत मोठा जमीन घोटाळा? वक्फ जमिनींच्या व्यवहारांना वक्फ मंडळाची नोटीस, जमिनींच्या व्यवहारांचा पर्दाफाश होणार? एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्याच्या कनेक्शनमुळे प्रकरण चर्चेत, 44 जणांना नोटीस, 7 दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश रत्नागिरी : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची चौथ्या मजल्यावरून उडी, पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा, ‘माहेरून फ्लॅट घेण्यासाठी पैसे आणावेत, अन्यथा मुलाचा दुसरा विवाह करून देऊ’, मुलांपासून दूर ठेवल्याचा तक्रारीत आरोप पाच सागरी जिल्ह्यांतील भूमिपुत्रांची एकजूट, ‘सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना रत्नागिरी : ज्येष्ठ पत्रकार जावेद मुजावर यांचे निधन,पत्रकारिता, सहकार क्षेत्रात हळहळ धक्कादायक खेडमध्ये दोन तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल

खेड : 21 वर्षीय तरुणाची आत्महत्या

banner 468x60

खेड तालुक्यातील घेरा पालगड गावात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. तुषार किशोर शिंदे (२१, रा. बी. ६ सो.सा. व्हाईट अपार्टमेंट, राम मंदिर जवळ, खोपट, ठाणे; मूळ रा. घेरा पालगड, ता. खेड, जि. रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.


ही घटना १२ जुलै रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. तुषारने आपल्या मूळ गावी येऊन राहत्या घरातील लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आयुष्य संपवले.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुषार ११ जुलै रोजी ठाण्याहून कोणाला काहीही न सांगता घेरा पालगड येथे आला होता.

घरच्यांपासून दूर जाऊन अचानक मूळ गावी येणे आणि त्यानंतर इतका टोकाचा निर्णय घेणे, यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस तपास सुरु असून आत्महत्येचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी पुढील चौकशी केली जात आहे.
या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *