Breaking News
दापोली : मद्यधुंद कारचालकाची पादचाऱ्यांना धडक, दोघे गंभीर जखमी, कुंभवे शिगवणवाडी येथील घटना देवरुख : आंबव येथे रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळला तरुण, उपचारादरम्यान मृत्यू, फिटचा झटका आल्याने डोक्याला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती रत्नागिरीच्या कोकणनगरमध्ये घरफोडी, 4 लाख 72 हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास संगमेश्वर : कडवई प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात, धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत संगमेश्वर : नाणीज येथे प्रवासादरम्यान प्रकृती बिघडली, 28 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, मावस बहिणीच्या साखरपुड्यासाठी गेला होता कुटुंबासोबत

खेड : बहिरवली मोहल्ला बंदर जेटीच्या निकृष्ट कामावर ग्रामस्थ आक्रमक, ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी

banner 468x60

खेड तालुक्यातील बहिरवली मोहल्ला क्र. 1 येथे सुरू असलेल्या बंदर जेटी बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असून या कामाबाबत ग्रामस्थांत तीव्र संतापाची लाट उसळली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, रत्नागिरी येथील मुख्य कार्यकारी अभियंत्यांना जागृत ग्रामस्थ व जमातीच्या अध्यक्षांच्यावतीने निवेदन सादर करण्यात आले आहे.

या निवेदनात नमूद केले आहे की, जुनी जेटी धोकादायक बनल्यामुळे नवीन जेटीचे बांधकाम आवश्यक होते. मात्र जानेवारीपासून सुरू झालेल्या नव्या जेटीच्या कामामध्ये दर्जा आणि शासकीय निकषांचा अभाव दिसून येतो. ग्रामस्थांच्या मते मुख्य ठेकेदाराने दुसर्‍या ठेकेदारामार्फत काम सुरू केले असून, सिमेंट, स्टील यांचा वापर शासकीय मानकांप्रमाणे न करता काळ्या दगडावर थर दिला गेला आहे.

या कामामुळे जेटीला ठिकठिकाणी मोठ्या भेगा पडल्या असून त्या केवळ सिमेंट-रेतीने बुजवण्यात येत आहेत. जेटीचे बांधकाम तळापासून न करता जुन्याच ढासळलेल्या जेटीवर केले गेले असून नवीन जेटीची उंचीही अपुरी असल्याने भरतीच्या वेळी पाणी जेटीवर येते.

या खराब कामामुळे बहिरवली ते कर्जी, पन्हाळजे, तसेच चिपळूण-करंबवणे येथे जाणार्‍या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वयोवृद्ध, महिलांना जेटीवरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने चौकशी करून दोषी ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या तक्रारीकडे संबंधित यंत्रणांनी कारवाई करण्याची ग्रामस्थांची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *