Breaking News
दापोली : मद्यधुंद कारचालकाची पादचाऱ्यांना धडक, दोघे गंभीर जखमी, कुंभवे शिगवणवाडी येथील घटना देवरुख : आंबव येथे रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळला तरुण, उपचारादरम्यान मृत्यू, फिटचा झटका आल्याने डोक्याला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती रत्नागिरीच्या कोकणनगरमध्ये घरफोडी, 4 लाख 72 हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास संगमेश्वर : कडवई प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात, धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत संगमेश्वर : नाणीज येथे प्रवासादरम्यान प्रकृती बिघडली, 28 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, मावस बहिणीच्या साखरपुड्यासाठी गेला होता कुटुंबासोबत

खेड : रिक्षा-दुचाकीचा भीषण अपघात दोघे गंभीर जखमी

banner 468x60

मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळजवळ शनिवारी सायंकाळच्या सुमारास रिक्षा आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात होऊन दोघेजण गंभीररित्या जखमी झाले आहेत.

जखमींना तातडीने कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूकही खोळंबली होती, ज्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात वेरळ गावच्या हद्दीत घडला. अपघाताची तीव्रता इतकी होती की, दुचाकी आणि रिक्षा या दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी आणि महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी तात्काळ धाव घेत जखमींना मदत केली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि वाहतूक सुरळीत केली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *