Breaking News
रत्नागिरी : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची चौथ्या मजल्यावरून उडी, पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा, ‘माहेरून फ्लॅट घेण्यासाठी पैसे आणावेत, अन्यथा मुलाचा दुसरा विवाह करून देऊ’, मुलांपासून दूर ठेवल्याचा तक्रारीत आरोप पाच सागरी जिल्ह्यांतील भूमिपुत्रांची एकजूट, ‘सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना रत्नागिरी : ज्येष्ठ पत्रकार जावेद मुजावर यांचे निधन,पत्रकारिता, सहकार क्षेत्रात हळहळ धक्कादायक खेडमध्ये दोन तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल दाभोळ : आघारीत 54 वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू, भुंडावड परिसरात आढळले होते बेशुद्ध

खेड : दुचाकी अपघातात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मोहन आंब्रे यांचे निधन

banner 468x60

शिवसेनेतील ज्येष्ठ कार्यकर्ते, खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि चिरणी गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व मोहन आंब्रे (वय ६५) यांचे अपघाती निधन झाल्याची हळहळजनक घटना घडली आहे. चिरणी येथे घराचे बांधकाम सुरू असल्याने मंगळवारी दुपारी ते बुलेटवरून लोटेच्या दिशेने निघाले असता, चिरणी पुलावर त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या बाईकची जोरदार धडक बसली.


या भीषण अपघातात आंब्रे यांना गंभीर दुखापत झाली. डोक्याला जबर मार लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती. अपघातानंतर तातडीने त्यांना चिपळूण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर रत्नागिरी व त्यानंतर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारांना प्रतिसाद न देता, मंगळवारी मध्यरात्री उशिरा त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


मोहन आंब्रे हे शिवसेनेतील जुन्या पिढीतील अत्यंत कार्यक्षम आणि कडव्या कार्यकर्त्यांपैकी एक मानले जात होते. तालुका प्रमुख, पंचायत समितीचे उपसभापती अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या होत्या. चिरणी गावासह संपूर्ण खेड तालुक्यात त्यांचा सामाजिक आणि राजकीय प्रभाव होता.


त्यांच्या निधनामुळे खेड तालुक्यात शोककळा पसरली आहे. अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहत दुःख व्यक्त केलं आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, आर्मीमधून निवृत्त भाऊ, भावजय असा मोठा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *