Breaking News
रत्नागिरी : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची चौथ्या मजल्यावरून उडी, पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा, ‘माहेरून फ्लॅट घेण्यासाठी पैसे आणावेत, अन्यथा मुलाचा दुसरा विवाह करून देऊ’, मुलांपासून दूर ठेवल्याचा तक्रारीत आरोप पाच सागरी जिल्ह्यांतील भूमिपुत्रांची एकजूट, ‘सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना रत्नागिरी : ज्येष्ठ पत्रकार जावेद मुजावर यांचे निधन,पत्रकारिता, सहकार क्षेत्रात हळहळ धक्कादायक खेडमध्ये दोन तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल दाभोळ : आघारीत 54 वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू, भुंडावड परिसरात आढळले होते बेशुद्ध

संगमेश्वर : गोळवली येथील आमकर वाडी येथे भूस्खलन

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील गोळवली आमकर वाडी येथे रविवारी रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले असून सध्या तरी यामुळे कोणतीही हानी झाली नसली, तरी परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

रविवारी रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. संततधारेमुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी पार केली असून,

संगमेश्वर मधील शास्त्री नदीच्या पाणी पातळी झपाट्याने वाढल्यामुळे संगमेश्वर तालुक्यातील रामपेठ बाजारपेठ पूर्णतः जलमय झाली आहे.

संगमेश्वर नायरी मार्गावर कसबा येथे पुराचे पाणी आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी आज पावसाने थैमान घातल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचणे देखील अवघड झाले होते.

शाळांनी आयोजित केलेल्या प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमावर पावसाने व्यक्ती आणला. तर गोळवली आमकरवाडी येथे भूस्खलनाची घटना घडली असून सुदैवानं जीवितहानी झालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *