दापोली : उपजिल्हा रुग्णालयाच्या लिफ्टच्या टाकीत पडून 5 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

banner 468x60

दापोलीमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या नव्याने सुरू असलेल्या बांधकामात लिफ्टच्या टाकीत पडून समीर श्रीकांत चव्हाण या ५ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

banner 728x90 banner 728x90

ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत असून उपजिल्हा रुग्णालयासमोर मोठा जनसमुदाय जमला आहे.

दापोली तहसीलदार अर्चना घोलप यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. ठेकेदारावर कडक कारवाई व्हावी, अशी नागरिकांकडून मागणी करण्यात येत आहे.

या घटनेतील जबाबदार अधिकार्‍यांवर कठोर कारवाई होण्याची अपेक्षा नागरिकातून व्यक्त केली जात आहे. दरम्यान संबधित व्यकतींवर पोलीस काय कारवाई करतात हे देखील पाहावं लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *