Breaking News
रत्नागिरी : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची चौथ्या मजल्यावरून उडी, पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा, ‘माहेरून फ्लॅट घेण्यासाठी पैसे आणावेत, अन्यथा मुलाचा दुसरा विवाह करून देऊ’, मुलांपासून दूर ठेवल्याचा तक्रारीत आरोप पाच सागरी जिल्ह्यांतील भूमिपुत्रांची एकजूट, ‘सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना रत्नागिरी : ज्येष्ठ पत्रकार जावेद मुजावर यांचे निधन,पत्रकारिता, सहकार क्षेत्रात हळहळ धक्कादायक खेडमध्ये दोन तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल दाभोळ : आघारीत 54 वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू, भुंडावड परिसरात आढळले होते बेशुद्ध

खेड-दापोली मार्गावरील अवजड वाहतूक आजपासून बंद

banner 468x60

खेड- दापोली राज्य मार्ग क्रमांक 162 वरील फुरूस पुलाचे काम सुरु होणार असून, या पार्श्वभूमीवर 12 ते 22 जून या कालावधीत या मार्गावरील वाहतूक अवजड वाहनासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.

फुरूस येथे तयार झालेल्या पुलाखालून पाण्याचा प्रवाह वळवण्यासाठी 11 व 12 जून रोजी सर्व वाहतूक बंद ठेवण्यात आल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली आहे. पुलाचे काम पूर्ण न झाल्यामुळे खेड-दापोली मार्गावरील अवजड वाहतूक वळवून दस्तुरी-सोंडेघर-पालगड मार्गाने केली जाणार आहे.

खेडच्या फुरूस येथील पुलाच्या कामासाठी व अवजड वाहतुकीमुळे होणाऱ्या अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. खासगी वाहने, माल वाहतूक करणारी वाहने, तसेच अन्य कोणतीही अवजड वाहने खेड-दापोली मार्गावरून नेण्यास बंदी घातली आहे. तसेच 11 व 12 जून रोजी पुलाखालून पाण्याचा प्रवाह पूर्णपणे वळवण्यासाठी संपूर्ण वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

वाहतूक बंद कालावधीत नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा व पोलिसांनी वाहतूक नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात असे निर्देश दिले आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर मोटार वाहन अधिनियम 1988 नुसार कारवाई करण्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे काही काळ नागरिकांची गैरसोय होणार असली तरी फुरूस पुलाचे काम पूर्ण होऊन भविष्यातील प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *