चिपळुण : सुनेच्या छळाला कंटाळून सासऱ्याची आत्महत्या

banner 468x60

चिपळुणात सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्याने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मार्कडी येथील साईदर्शन अपार्टमेंटमध्ये सुनेच्या आणि तिच्या माहेरच्या नातेवाईकांच्या मानसिक छळाला कंटाळून ५९ वर्षीय सासऱ्याने आत्महत्या केली.

banner 728x90

या प्रकरणी मृताच्या सूनेसह तिच्या माहेरच्या आठ जणांविरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये 5 महिला व 3 पुरुष (मंदार सुरेंद्र पोटफोडे, प्रसाद प्रमोद करडे, प्रशांत प्रमोद करडे) यांचा समावेश आहे.

याबाबतची फिर्याद मृताच्या मुलाने दिली. १ फेब्रुवारी २०२० ते ४ जानेवारी २०२२ या कालावधीत हा छळ झाल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरनाथ वामनराव कोवळे (५९ वर्षे) यांनी मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. अमरनाथ कोवळे यांच्या मुलाचे आरोपी महिलेसोबत ०१ फेब्रुवारी २०२० रोजी लग्न झाले होते. लग्नानंतर आरोपी पत्नीचे वागणे बदलले आणि ती घरात चांगल्या प्रकारे वागत नव्हती. तसेच ती सासू-सासऱ्यांचा अपमान करत असे. सासूने तिला वेळोवेळी

समजावून सांगितले होते, मात्र तिच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही. तिने आपल्या सासुलाही मानसिक त्रास दिला असे म्हंटले आहे. एवढेच नव्हे तर “स्वतःच्या जीवाला काहीतरी ओरखाडे करून त्याचे खापर तुमच्यावर फोडेन,” अशी धमकी देऊन सासू सासऱ्यांवर दबाव टाकत होती. याबद्दल तिच्या माहेरच्या लोकांनाही सांगण्यात आले. त्यांनी देखील मयताच्या मुलाच्या कुटुंबीयांना उलटसुलट उत्तरे दिली.

आरोपी हे मयताचे म्हणणे टाळत होते आणि त्यांच्याशी अपमानास्पद, अर्वाच्य व अश्लील भाषेत बोलत होते. आरोपींच्या या मानसिक छळ, अपमानास्पद वागणूक आणि खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या धमकीला कंटाळून अमरनाथ वामनराव कोवळे यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.

या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३०६ (आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे), ५०६ (गुन्हेगारी धमकी) आणि ३४ (समान उद्देश) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिपळूण पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *