दापोली : विजेचा धक्का लागून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

Screenshot

banner 468x60

दापोली तालुक्यातील लाडघर येथील सुनिल मिजानंद होलम वय-62 वर्षे रा. लाडघर औदुंबरवाडी यांचा राहत्या घरी विजेचा धक्का लागून उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

Screenshot

मिळालेल्या माहितीनुसार दि.०३ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजताचे सुमारास सुनिल मिजानंद होलम वय ६२ वर्षे रा. लाडघर औदुंबरवाडी ता. दापोली जि. रत्नागिरी हे त्यांचे घरी लाडघर येथे घरामध्ये इनव्हर्टरचे काम करित असतांना विजेचा धक्का लागला .

तातडीने त्यांना भागवत हॉस्पीटल दापोली येथे उपचारासाठी दाखल केले गेले. डॉक्टरांनी त्यांना तपासून पावणेसात वाजताचे दरम्यान मयत घोषीत केले .

सदर आकस्मिक मृत्यूची नोंद दापोली पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. पुढील तपास सपोफौ गुजर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *