गुहागर येथील देवघर येथील एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील हगवणे प्रकरण समोर असतानाच देवघर येथील सासऱ्याला जवानी फुटलीय. सासऱ्याची हैवानी वृत्ती समोर आली आहे.
सासऱ्याकडून केवळ २१ वर्षीय सूनेचा विनयभंग करण्यात आला आहे. गेले वर्षभर सासऱ्याकडून होणाऱ्या विनयभंगाला कंटाळून २१ वर्षीय सुनेने सासऱ्यासह त्यांना पाठिशी घालणाऱ्या सासू व नणंद यांच्याविरोधात गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार केल्याने गुहागर तालुक्यातील देवघर, झोंबडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
तक्रारीनुसार, आरोपी सासऱ्याचे अश्लील वर्तन गेल्या काही दिवसांपासून सुरू होते. कुटुंबीयांच्या हस्तक्षेपाने यापूर्वी एक बैठक घेऊन आरोपीकडून माफीनामा लिहून घेतला गेला होता.
या तक्रारीत सुनेने म्हटले आहे की, देवघर-झोंबडी फाटा येथे मी पतीसह सासरे विजय शांताराम सकपाळ, सासू विशाखा, नणंद तेजस्विनी सुमीत मोरे असे एकत्र कुटुंबात राहतो. माझे लग्न २८ एप्रिल २०२४ रोजी हिंदू रितीरीवाजाने झाले असून पती त्यावेळी हाँटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत होते. सासऱ्याचे झोंबडी फाट्यावर दोन जनरल स्टोअर्स असून यातील एक निळकंठेश्वर जनरल स्टोअर्स नणंद तेजस्विनी चालविते तर दुसरे कालभैरव स्टोअर्स हे आमच्या घरातूनच सासरे चालवितात.
जून २०२४ पासून सासरे विजय यांच्याकडून माझा विनयभंग केला आहे. संबंधित महिलेने गुहागर पोलिस स्थानकात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सासऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, आरोपी सासऱ्याचे अश्लील वर्तन गेल्या काही दिवसांपासून सुरू होते. कुटुंबीयांच्या हस्तक्षेपाने यापूर्वी एक बैठक घेऊन आरोपीकडून माफीनामा लिहून घेतला गेला होता.
मात्र, या नंतरही त्याच्या वागणुकीत काहीच फरक पडला नाही. काही दिवसांपूर्वी घडलेल्या पुन्हा अशाच घटनेमुळे पीडित महिलेने अखेरीस पोलिसांत धाव घेतली.
जात आहे. अश्लील वर्तन करुन लज्जास्पद बोलणे, शरीरसुखाची मागणी करणे असे प्रकार सातत्याने सुरु असल्याचे तीने सांगितले.
सातत्याने घडणारे हे प्रकार मी पती व कुटुंबियांच्या कानावर घालायचे मात्र, समजुतीने ते मिटविण्यात येत होते. मात्र, १९ मे २०२५ रोजी पती कामानिमित्त मुंबईला गेल्यावर सकाळी ७ वाजताच्या सुमारास सासरे विजय यांनी अश्लीलतेने वागून विनयभंग केला. याला कंटाळून मी पती यांच्याकडे मुंबईला निघून गेले.
यानंतर माझ्या आई-वडिलांकडे हा प्रकार पुन्हा सांगून व त्यांच्याशी चर्चा करुन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याचे यामध्ये तक्रार अर्जात म्हटले आहे. दरम्यान, गुहागर पोलीस ठाण्यात सासरा, सासू व नणंद यांच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता ७४. ७८ (२), ७९, ३५१ (२), ३५२, ३ (५) अधिनियमानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गुहागर पोलीस करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















