Breaking News
दापोली : मद्यधुंद कारचालकाची पादचाऱ्यांना धडक, दोघे गंभीर जखमी, कुंभवे शिगवणवाडी येथील घटना देवरुख : आंबव येथे रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळला तरुण, उपचारादरम्यान मृत्यू, फिटचा झटका आल्याने डोक्याला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती रत्नागिरीच्या कोकणनगरमध्ये घरफोडी, 4 लाख 72 हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास संगमेश्वर : कडवई प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात, धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत संगमेश्वर : नाणीज येथे प्रवासादरम्यान प्रकृती बिघडली, 28 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, मावस बहिणीच्या साखरपुड्यासाठी गेला होता कुटुंबासोबत

दापोली : घरात घुसून पती-पत्नीला मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

banner 468x60

दापोली तालुक्यातील मुरुड येथे घर दुरुस्तीचे काम सुरू असताना घरात घुसून एका महिलेला आणि तिच्या पतीला मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना २४ मे रोजी सकाळी ११.४० वाजता घडली असून, दापोली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. फिर्यादी महिलेने दिलेल्या माहितीनुसार, २४ मे रोजी सकाळी त्यांच्या घराची खिडकी दुरुस्त करण्यासाठी कामगार आले होते.

त्यावेळी आरोपी अज्ञानी विष्णू वरवडेकर, चैताली अज्ञानी वरवडेकर आणि अतुल सावंत (सर्व रा. मुरुड, ता. दापोली) यांनी फिर्यादीच्या घरात प्रवेश केला.

त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या पतीला घरातून बाहेर जाण्यापासून अडवले. इतकेच नव्हे तर, त्यांना हाताने मारहाण करून शिवीगाळ करत दमदाटी केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, दापोली पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *