दापोली : कोंडीच्या पुलावरुन तरुण गेला वाहुन

banner 468x60

कोकणात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेत. दापोली तालुक्यातील वणंद येथील नदीला पूर आल्याने दापोली कोंडीच्या पुलावरुन तरुण वाहुन गेल्याची घटना घडली आहे.

news update kokan katta news whatsap

https://chat.whatsapp.com/GcWatBPR9HN5HBMUsjHVuW

दापोली तालुक्यातील वणंद येथील नदीला आला पुर आल्याने वाहतूक बंद आहे. पुरामुळे कोंडीच्या पुलावरुन तरुण वाहून गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी ड्युटीवरुन घरी परतत असताना अनुचित प्रकार घडला आहे.

सदर तरुणाला पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण वाहून गेलाय. राजेंद्र कोळंबे वयवर्ष 45 असं वाहुन गेलेल्या तरुणाचं नाव आहे. दापोली पोलीस प्रशासन, महसूल विभाग, गावकरी सध्या नदीपात्रात शोध घेत आहेत. ही बातमी आम्ही आताच ब्रेक केली असून बातमी अपडेट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *