चिखलगाव : कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ऋतुजा तेलप झाली पोलीस कॉन्स्टेबल

banner 468x60

कठोर परिश्रम, जिद्द व प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आपण आपले ध्येय कसे साध्य करू शकतो, हे मळे गावातील ऋतुजा बाळकृष्ण तेलप या सर्वसामान्य शेतकरी कुटुबांतील मुलीने दाखवून दिले आहे.

प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या शक्य करता येतात. अशीच एक सक्सेस स्टोरी समोर आली आहे.

ऋतुजा बाळकृष्ण तेलप, मळे गावामध्ये राहणारी विद्यार्थिनी, लोकसाधना संचालित, लोकमान्य टिळक विद्यामंदिर व ज्यु. कॉलेज चिखलगावमध्ये” इ. 8 वी ते 12 वी, मळे ते चिखलगाव 6 कि.मी. असा पायी प्रवास करून तिने आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं.

पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगून अखेर तिने ते स्वप्न पूर्ण केलं आहे. ऍक्शन झोन अकॅडमी, विरार येथे 6 महिन्यांचे पोलीस भरतीसाठीचे ट्रेनिंग ऋतुजाने पूर्ण केले व पुढील 5 वर्षे अभ्यास आणि मेहनत करून आज तिची मुंबई पोलीस कॉन्स्टेबल म्हणून मुंबई मध्ये पोस्टिंग झाली आहे.

ऋतुजा, तिचे आई – बाबा यांचे संस्था, शाळा, कॉलेज व विद्यार्थी यांच्याकडून खूप – खूप अभिनंदन केलं जात आहे. छोटयाश्या गावात राहून अभ्यास करून आपण आपली स्वप्न पूर्ण करू शकतो हा आदर्श ऋतुजाने अनेक मुलींसमोर ठेवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *