दापोली : डॉ. भारत कराड लिखित ‘वृद्धाश्रमातील जीवन’ या पुस्तकाचे प्रकाशन

banner 468x60

वृद्धाश्रमातील जीवन आणि ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवांवर आधारित ‘Life in Old Age Homes (Understanding Environments and Experiences)’ हे वराडकर बेलोसे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत कराड लिखित महत्त्वपूर्ण पुस्तक नुकतेच एका उत्साही वातावरणात प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकाचे प्रकाशन दापोली येथील नामवंत सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक श्री. प्रतापराव जयराम महाडिक यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी डॉ. दशरथ भोसले, सौ. प्रतिभा प्रतापराव महाडिक, डॉ. रणजीत महाडिक आणि डॉ. सुवर्णा कराड हे मान्यवर उपस्थित होते.

banner 728x90 banner 728x90


डॉ. कराड यांनी या पुस्तकात वृद्धाश्रमातील वास्तव, व्यवस्थापन, आरोग्य सेवा, सामाजिक संबंध, मानसिक आरोग्य, पोषण, आर्थिक अडचणी आणि जीवनाच्या अंतिम टप्प्यातील सेवा या विविध महत्त्वपूर्ण विषयांची सखोल मांडणी केली आहे. भारतातील वृद्धाश्रमांची रचना, ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि वृद्धांवरील कायदेशीर व्यवस्थेचाही अभ्यासपूर्ण आढावा लेखकाने घेतला आहे.

हे पुस्तक केवळ संशोधनापुरते मर्यादित न राहता, धोरणनिर्माते, सामाजिक कार्यकर्ते, आरोग्यसेवा कर्मचारी आणि वृद्धांच्या कुटुंबीयांसाठी एक प्रभावी मार्गदर्शक ठरते. जुन्या पिढीच्या गरजा आणि त्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचे सुसंगत विश्लेषणही या पुस्तकात करण्यात आले आहे. अनेक उदाहरणांच्या साहाय्याने विद्यमान व्यवस्थेत सुधारणा कशा करता येतील हेही उलगडले आहे.


पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी बोलताना श्री. प्रताप महाडिक म्हणाले, “आजच्या बदलत्या सामाजिक रचनेत वृद्धांना सन्मानाने व सुसंवादाने जगता यावे यासाठी अशा प्रकारचे साहित्य अत्यावश्यक आहे.”


नित्य पब्लिकेशनने प्रकाशित केलेले हे पुस्तक 185 पानांचे असून इंग्रजी भाषेत आहे. वृद्ध कल्याणासाठी कार्य करणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक एक उपयुक्त, मार्गदर्शक आणि विचारप्रवृत्त करणारे ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *