लांजा : तरुणीचा विनयभंग, पोलीस पाटलावर गुन्हा दाखल

banner 468x60

गावात आयोजित क्रिकेट सामन्याच्या वेळी १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी लांजा तालुक्यातील एका पोलीस पाटलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १४ मे रोजी रात्री ११.४५ च्या सुमारास घडली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आपल्या कुटुंबासह गावातील क्रिकेट सामना पाहण्यासाठी गेली होती. ती भावाच्या मित्राशी मोबाईलवर बोलत असताना संबंधित पोलीस पाटील तिच्या जवळ आला व तिचा हात पकडून तिला अंधारात नेण्याचा प्रयत्न करत विनयभंग केला.

या प्रकरणी पीडितेने लांजा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, २७ वर्षीय पोलीस पाटलावर भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ७४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल जान्हवी मांजरे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *