Breaking News
दापोली : मद्यधुंद कारचालकाची पादचाऱ्यांना धडक, दोघे गंभीर जखमी, कुंभवे शिगवणवाडी येथील घटना देवरुख : आंबव येथे रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळला तरुण, उपचारादरम्यान मृत्यू, फिटचा झटका आल्याने डोक्याला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती रत्नागिरीच्या कोकणनगरमध्ये घरफोडी, 4 लाख 72 हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास संगमेश्वर : कडवई प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात, धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत संगमेश्वर : नाणीज येथे प्रवासादरम्यान प्रकृती बिघडली, 28 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, मावस बहिणीच्या साखरपुड्यासाठी गेला होता कुटुंबासोबत

दापोली : दापोली-दाभोळ रस्त्यावर गांजा विक्री करणाऱ्या महिलेला अटक

banner 468x60

दापोली-दाभोळ रस्त्यावर सार्वजनिक शौचालयासमोर गांजा विक्री करणाऱ्या एका महिलेला दापोली पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून ८०० रुपये किमतीचा ६० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई काल, ८ मे रोजी सायंकाळी ७:२५ वाजता करण्यात आली. याबाबत पोलीस हवालदार स्वप्नील शिवलकर यांनी दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, दापोली-दाभोळ रोडवर सार्वजनिक शौचालयाच्या पूर्वेकडील बाजूला एका कांदा- बटाटा विक्रीच्या हातगाडीजवळ ही महिला संशयास्पद स्थितीत आढळून आली.

पोलिसांनी तिची तपासणी केली असता, तिच्याजवळ अंदाजे ८०० रुपये किमतीचा ६० ग्रॅम गांजा विक्रीसाठी ठेवलेला आढळला. आरोपी महिलेवर अमली पदार्थ विरोधी कायदा १९८५ चे कलम ८ (क) आणि २२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *