Breaking News
दापोली : मद्यधुंद कारचालकाची पादचाऱ्यांना धडक, दोघे गंभीर जखमी, कुंभवे शिगवणवाडी येथील घटना देवरुख : आंबव येथे रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळला तरुण, उपचारादरम्यान मृत्यू, फिटचा झटका आल्याने डोक्याला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती रत्नागिरीच्या कोकणनगरमध्ये घरफोडी, 4 लाख 72 हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास संगमेश्वर : कडवई प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात, धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत संगमेश्वर : नाणीज येथे प्रवासादरम्यान प्रकृती बिघडली, 28 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, मावस बहिणीच्या साखरपुड्यासाठी गेला होता कुटुंबासोबत

दापोली : आंजर्ले समुद्रात पोहायला गेलेल्या पुण्यातील 22 वर्षीय महिला पर्यटकाचा बुडून मृत्यू

Screenshot

banner 468x60

दापोलीमध्ये पुणे येथून पर्यटनासाठी आंजर्ले येथे आलेल्या एका महिला पर्यटकाचा समुद्रात पोहण्यासाठी गेले असताना बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी 4.30 चे सुमारास घडली आहे.


याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे येथून 12 जणांचा एक ग्रुप आज पहाटे 4 वाजता आंजर्ले येथे पर्यटनासाठी जाण्यासाठी निघाला. ते 11 वाजता आंजर्ले येथे पोचले. तेथील एका रिसॉर्ट वर त्यांनी नाश्ता केला व 4 वाजण्याच्या सुमारास ते पोहण्यासाठी समुद्राच्या पाण्यात गेले.

पोहत असताना एक मोठी लाट आली व त्या लाटेत या ग्रुपमधील तन्वी निलेश पारखी वय 22, रा. विश्रांती वाडी पुणे दिसेनाशी झाली, त्यावेळी सोबत असलेल्या मित्रानी किनाऱ्यावरील ग्रामस्थांना माहिती दिल्यावर ग्रामस्थांनी पाण्यात बुडालेल्या तन्वीला पाण्याबाहेर काढून किनाऱ्यावर आणले मात्र तन्वी बेशुद्ध पडली होती.

तिला उपचारासाठी दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आले होते, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिला मृत घोषित केले. दापोली पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्याचे काम सुरु आहे.
या घटनेमुळे आंजर्ले परिसरात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *