चिपळूण : कार आणि टेम्पोचीधडक, पाच जखमी

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील नायशी फाट्याजवळ मुंबई-गोवा महामार्गावर दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली, ज्यात पाच जण किरकोळ जखमी झाले. हा अपघात ७ मे २०२५ रोजी पहाटे सुमारे २.५० वाजता घडला.


या अपघातात प्रविण बाबासो इंगळे (वय ३२, रा. बदलापूर, ठाणे), ईश्वर नागा पुजारी, जालाजा ईश्वर पुजारी आणि रोशनी ईश्वर पुजारी (सर्व रा. बदलापूर, ठाणे) तसेच दुसऱ्या वाहनाचा चालक किसान शिवराम पालकर (रा. पोफळवणे, खेड, रत्नागिरी) हे जखमी झाले आहेत. प्रविण इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते त्यांची टाटा टिगोर गाडी (क्रमांक MH05/FB/1462) घेऊन मुंबई-गोवा महामार्गावरून जात असताना,

गोवा बाजूकडून मुंबईकडे येणाऱ्या सुझुकी कॅरी टेम्पो (क्रमांक MH12/TZ/8965) ने अचानकपणे चुकीच्या बाजूने येऊन त्यांच्या गाडीला समोरून धडक दिली. या धडकेत दोन्ही गाड्यांच्या समोरील भागाचे नुकसान झाले असून गाडीतील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली.

चिपळूण पोलिसांनी या प्रकरणी सुझुकी कॅरी टेम्पोचा चालक किसान शिवराम पालकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१, १२५ (अ) आणि मोटार वाहन कायद्याचे कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *