Breaking News
लांजा : उत्पादन शुल्कची धडक कारवाई, गोवा बनावटीचा मद्यसाठा व टेम्पोसह 23.63 लाखांचा मुद्देमाल जप्त गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव

दापोली : चिल्लंगी मोहल्ला येथील टेरेसवर गांजा सेवन करताना तरुण ताब्यात

banner 468x60

दापोली बाजारपेठेतील चिल्लंगी मोहल्ला येथे एका नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या टेरेसवर गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करताना एका २८ वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

banner 728x90 banner 728x90

ही कारवाई ४ मे २०२५ रोजी रात्री २२.५० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद जमा इस्तफाक अहमद शेख (वय २८, मूळ रा. दर्गजोत संत कबीर नगर, उत्तरप्रदेश, सध्या रा. दापोली चिल्लंगी मोहल्ला) हा दापोली बाजारपेठ येथील एका इमारतीच्या टेरेसवर गांजा ओढत असल्याची माहिती दापोली पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल उदय केशव टेमकर यांनी घटनास्थळी छापा टाकला आणि शेख याला गांजा सेवन करताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल उदय टेमकर यांच्या फिर्यादीवरून दापोली पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायदा १९८५ चे कलम ८(क), २७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *