दापोली : लोकमान्य टिळक विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, चिखलगावचा 12 वीचा निकाल कौतुकास्पद – विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

banner 468x60

चिखलगाव (ता. दापोली) | लोकसाधना संचलित लोकमान्य टिळक विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, चिखलगाव येथील शैक्षणिक वर्ष २०२४-२५ चा इयत्ता १२ वीचा निकाल अत्यंत कौतुकास्पद ठरला आहे. वाणिज्य व कला शाखेतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवून संस्थेच्या यशात भर घातली आहे.

वाणिज्य शाखेचा निकाल ९६.५५% इतका लागला असून, कु. ऋषिकेश महेश लोहार याने ८३.८३% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. कु. तन्वी तेजस सोलकर (७५.५०%) व कु. ईशा संदीप दवंडे (७४%) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवून आपले नाव यशस्वी विद्यार्थ्यांच्या यादीत नोंदवले.

कला शाखेचा निकाल १००% लागला असून, कु. अमित काशिनाथ मुकनाक (५४.६७%), कु. शुभम चंद्रकांत बोरघरे (४७.५०%) व कु. अमर दत्तात्रय मोरे (४६.३३%) हे प्रमुख गुणवंत विद्यार्थी ठरले.


या यशामध्ये विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमासोबतच मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, पालक व संस्थेच्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा आहे. एकत्रित निकाल ९७.०६% लागल्याने संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. सर्व उत्तीर्ण व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *