Breaking News
लांजा : उत्पादन शुल्कची धडक कारवाई, गोवा बनावटीचा मद्यसाठा व टेम्पोसह 23.63 लाखांचा मुद्देमाल जप्त गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव

दापोली : नगराध्यक्षा ममता मोरे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर, बाजूने केवळ एक मत

banner 468x60

दापोली नगरपंचायतीच्या इतिहासात एक अभूतपूर्व घटना घडली आहे. नगराध्यक्षा
. ममता बिपीन मोरे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव १६ विरुद्ध ०१ अशा मोठ्या फरकाने मंजूर झाला. या घटनेमुळे दापोलीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

banner 728x90 banner 728x90

नगराध्यक्षा. मोरे यांनी अविश्वास प्रस्तावाला धैर्याने सामोरे जात सभागृहात जोरदार भाषण केले. त्यांनी या प्रस्तावाला नैतिक दृष्ट्या आपला ठाम विरोध असल्याचे स्पष्ट केले. “हा केवळ माझ्यावरचा नाही, तर दापोलीतील जनतेवरचा अविश्वास आहे,” असे रोखठोक मत. मोरे यांनी व्यक्त केले. त्यांच्या या राजकीय धैर्याचे सभागृहातील सदस्यांनी कौतुक केले.


दरम्यान, अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर नगराध्यक्षा. ममता बिपीन मोरे यांनी या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

त्यांनी ठरावाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली असून, आता न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दापोली नगरपंचायतीच्या या राजकीय घडामोडींमुळे आगामी काळात काय बदल घडतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *