Breaking News
लांजा : उत्पादन शुल्कची धडक कारवाई, गोवा बनावटीचा मद्यसाठा व टेम्पोसह 23.63 लाखांचा मुद्देमाल जप्त गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव

राजापूर : पोलीस भरतीचे आमिष दाखवून तरुणाची 5 लाखांची फसवणूक

banner 468x60

राजापूर तालुक्यातील मोरोशी गावात एका २८ वर्षीय तरुणाची पोलीस भरतीमध्ये मदत करण्याच्या बहाण्याने तब्बल ४ लाख ९० हजार ९०६ रुपयांची फसवणूक झाली. या प्रकरणी ज्ञानेश वसंत पांचाळ (वय ३२, रा. शेपें, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) याच्या विरोधात राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90 banner 728x90

फिर्यादी लवेश यशवंत कानडे (२८, शिक्षण-बी.ए., व्यवसाय-नोकरी, सध्या रा. जोगेश्वरी पूर्व, मुंबई) याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ज्ञानेश पांचाळ याने लवेश याला विजय सुतार नावाचा आर्मी ऑफिसर ओळखतो आणि तो पोलीस भरतीसाठी मदत करू शकतो, असे भासवले.

यानंतर आरोपीने डिसेंबर २०२० ते १२ ऑगस्ट २०२४ या दरम्यान वेळोवेळी गुगल पे द्वारे फिर्यादीकडून एकूण ४ लाख ९० हजार ९०६ रुपये घेतले. लवेश कानडे याने आरोपीला पैशांबाबत विचारणा केली असता, तो त्यांना टाळाटाळ करत होता आणि आज-उद्या पैसे देतो, अशी खोटी आश्वासने देत होता.

अखेरीस त्रस्त होऊन लवेश कानडे याने ०३ मे २०२५ रोजी राजापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी ज्ञानेश पांचाळ याच्या विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी पांचाळ याच्याविरोधात विरोधात भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८(४) आणि ३१६ (२) अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *