Breaking News
देवरुख : आंबव येथे रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळला तरुण, उपचारादरम्यान मृत्यू, फिटचा झटका आल्याने डोक्याला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती रत्नागिरीच्या कोकणनगरमध्ये घरफोडी, 4 लाख 72 हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास संगमेश्वर : कडवई प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात, धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत संगमेश्वर : नाणीज येथे प्रवासादरम्यान प्रकृती बिघडली, 28 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, मावस बहिणीच्या साखरपुड्यासाठी गेला होता कुटुंबासोबत चिपळूण : 18 वर्षीय तरुणी बेपत्ता, अपहरणाचा गुन्हा दाखल, मोबाईलवर चॅटिंग करण्याच्या कारणावरून वडिलांनी दिली होती समज, घरातून निघून गेल्यानंतर तरुणीचा शोध सुरू

खेड : दुचाकीची एसटीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी

banner 468x60

मुंबई-गोवा महामार्गावर मोरवंड्याजवळ शुक्रवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास एक गंभीर अपघात झाला. चुकीच्या बाजूने आलेल्या एका दुचाकीस्वाराची थेट एसटी बसला धडक बसल्याने तो गंभीर जखमी झाला. जखमी दुचाकीस्वाराचे नाव समजू शकले नाही.


खेड आगाराचे बसचालक पी. डी. माने हे शिव-खेड बसमधून प्रवाशांना घेऊन खेडच्या दिशेने येत होते. त्याचवेळी मोरवंड्याजवळ समोरून चुकीच्या बाजूने आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या बसला जोरदार धडक दिली. बसचालक माने यांनी तत्काळ बस थांबवून जखमी दुचाकीस्वाराला उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.


अपघाताची माहिती मिळताच आगारप्रमुख रणजित राजेशिर्के यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. पोलीस यंत्रणाही तात्काळ घटनास्थळी दाखल झाली.

या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. सायंकाळ उशिरापर्यंत या अपघातासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *