Breaking News
लांजा : उत्पादन शुल्कची धडक कारवाई, गोवा बनावटीचा मद्यसाठा व टेम्पोसह 23.63 लाखांचा मुद्देमाल जप्त गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव

दापोली : एलईडी लाईटचा बेकायदेशीर पुरवठा करणारी बोट जप्त

Screenshot

banner 468x60

दापोली तालुक्यातील बुरोंडीच्या समुद्रात दुसऱ्या मासेमारी बोटींना बेकायदेशीरपणे एलईडी लाईटचा पुरवठा करणाऱ्या एका बोटीवर मत्स्यव्यवसाय विभागाने गुरुवारी रात्री कारवाई केली. या बोटीवर दोन तांडेल आणि दोन खलाशी आढळले असून, बोट जप्त करण्यात आली आहे.

banner 728x90 banner 728x90

मत्स्यव्यवसाय विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंमलबजावणी अधिकारी श्रीम. दीप्ती साळवी, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, दाभोळ) हे दि. २५ एप्रिल २०२५ रोजी मध्यरात्री ००.४५ वाजण्याच्या सुमारास बुरोंडीच्या समोर ११.५ सागरी मैलावर गस्त घालत होते.

त्यावेळी नझीम अली जांभारकर (रा. पडवे, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) यांच्या मालकीची ‘साबीर’ ही नौका (नोंदणी क्रमांक IND-MH-4-MM- 493) महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात बुरोंडी समोर अनधिकृतपणे एलईडी लाईटचा वापर करताना आढळून आली.

या बोटीवर तांडेल आणि दोन खलाशी होते. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत एलईडी लाईट वापरणाऱ्या या नौकेवर कारवाई करण्यात आली आहे. नौका जप्त करून दाभोळ बंदरात ठेवण्यात आली आहे. बोटीवर मासळी आढळली नसली तरी, एलईडी लाईट आणि ते पुरवणारी उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.

ही कारवाई सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी सागर कुवेस्कर आणि मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, रत्नागिरी आनंद पालव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अंमलबजावणी अधिकारी श्रीम. दीप्ती साळवी, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, दाभोळ), सागरी सुरक्षा पर्यवेक्षक, सागरी सुरक्षा रक्षक आणि गस्ती नौका रामभद्रावरील कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *