Breaking News
देवरुख : आंबव येथे रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळला तरुण, उपचारादरम्यान मृत्यू, फिटचा झटका आल्याने डोक्याला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती रत्नागिरीच्या कोकणनगरमध्ये घरफोडी, 4 लाख 72 हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास संगमेश्वर : कडवई प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात, धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत संगमेश्वर : नाणीज येथे प्रवासादरम्यान प्रकृती बिघडली, 28 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, मावस बहिणीच्या साखरपुड्यासाठी गेला होता कुटुंबासोबत चिपळूण : 18 वर्षीय तरुणी बेपत्ता, अपहरणाचा गुन्हा दाखल, मोबाईलवर चॅटिंग करण्याच्या कारणावरून वडिलांनी दिली होती समज, घरातून निघून गेल्यानंतर तरुणीचा शोध सुरू

दापोली : हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण

banner 468x60

दापोली तालुक्यातील मौजे आडे येथील राजलक्ष्मी हॉटेलमध्ये काम करणाऱ्या संदेश बजरंग पिळणकर (वय ४५) यांना सचिन साळवी नावाच्या व्यक्तीने खुर्चीने मारहाण करून जखमी केले.

ही घटना १९ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता घडली. याबाबतची तक्रार पिळणकर यांनी दापोली पोलीस ठाण्यात रात्री ९.२५ वाजता दाखल करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदेश पिळणकर हे राजलक्ष्मी हॉटेलमध्ये काम करत असताना संशयित आरोपी सचिन साळवी तेथे मोटारसायकलवरून आला.

चिंचघर गावातील पूर्वीच्या वादाचा राग मनात धरून त्याने पिळणकर यांना ‘तू इथे कसा काय आला आहेस’ असे विचारून शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने पिळणकर यांची कॉलर पकडली आणि हॉटेलमधील खुर्ची उचलून त्यांच्या डोक्यात सहा वेळा मारली, ज्यामुळे पिळणकर जखमी झाले.

दापोली पोलिसांनी आरोपी सचिन साळवी याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८(१), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *