Breaking News
लांजा : उत्पादन शुल्कची धडक कारवाई, गोवा बनावटीचा मद्यसाठा व टेम्पोसह 23.63 लाखांचा मुद्देमाल जप्त गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव

खेड : लोटेतील कंपनीत साहित्य चोरी, दोघेजण गजाआड

banner 468x60

खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील विनती ऑरगॅनिक्स कंपनीच्या स्टोअरच्या गोडावूनमधून २ लाख ७२ हजार ६४६ रुपयांच्या साहित्य चोरीप्रकरणी येथील पोलिसांनी अमित तुळशीराम गायकवाड (३२, रा. कापडी-पोलादपूर, महाड, सध्या नवी मुंबई ऐरोली), दत्तात्रय शिवाजी गोडसे (२४, नरळेवस्ती-सांगोला, सोलापूर) या दोघांच्या पोलिसांनी अवघ्या २४ तासातच मुसक्या आवळल्या. न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

banner 728x90 banner 728x90


मारुती विलास गवळी (रा.नरळेवस्ती-सांगोला, सोलापूर) हा संशयित पसार असून पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे. विनती कंपनीचे कृष्णा अशोक गांगुर्डे यांनी येथील पोलीस ठाण्यात गोडावूनमधून साहित्य चोरीस गेल्याची तक्रार नोंदवली होती.

पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत गायकवाड यांनी तपास गतिमान करत एका संशयिताच्या २४ तासातच मुसक्या आवळल्या होत्या. तर अन्य एकास चिपळुणातून शिताफीने अटक केली. अटकेतील संशयितांकडून अन्य चोऱ्यांचाही छडा लागण्याची शक्यता आहे.

त्यादृष्टीने पोलिसांकडून सखोल तपास करण्यात येत आहे. फरार संशयिताच्या लवकरच मुसक्या आवळू असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.


लोटे औद्योगिक वसाहतीसह परिसरात यापूर्वी चोरीच्या घटना घडल्या आहेत. या चोरीप्रकरणात अटकेतील संशयितासह पसार संशयितांचा सहभाग आहे का? याचाही पोलिसांकडून पडताळा केला, जात आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत गायकवाड करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *