Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

संगमेश्वर : येथे 75 वर्षीय वृद्धाची आत्महत्या; एकाकीपणामुळे टोकाचा निर्णय, गावात शोककळा

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील धामापूर येथे एका ७५ वर्षीय वृद्धाने मानसिक तणाव आणि एकाकीपणातून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, ग्रामीण भागातील एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रामचंद्र रावजी महाडीक (वय ७५, रा. धामापूर) हे आपल्या मूळ गावी एकटेच वास्तव्यास होते.

त्यांच्या पत्नीचे काही काळापूर्वी निधन झाले होते, तर त्यांची मुलं नोकरी व व्यवसायानिमित्त शहरात स्थायिक झाली आहेत. परिणामी, महाडीक यांना दैनंदिन आयुष्यात तीव्र एकाकीपणाचा सामना करावा लागत होता. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून ते मानसिकदृष्ट्या खचलेले दिसत होते.


२१ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास महाडीक हे कोणालाही काहीही न सांगता घरातून बाहेर पडले. संध्याकाळपर्यंत ते परत न आल्याने कुटुंबीय व ग्रामस्थांनी त्यांच्या शोधासाठी परिसरात शोधमोहीम सुरू केली. रात्री उशिरापर्यंत शोध सुरू ठेवण्यात आला, मात्र त्यांचा काहीच मागमूस लागला नाही. दरम्यान, २२ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ७:४५ वाजता धामापूर येथील ‘निमरीपार’ परिसरातील गडनदीच्या पात्रात एक मृतदेह तरंगताना काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आला. त्यांनी तात्काळ इतरांना याची माहिती दिली.

घटनास्थळी धाव घेतल्यानंतर जवळ जाऊन पाहणी केली असता तो मृतदेह रामचंद्र महाडीक यांचाच असल्याचे ओळख पटली. घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी गर्दी जमली आणि गावावर शोककळा पसरली. महाडीक यांच्या निधनाने गावातील ज्येष्ठ नागरिकांमध्येही भीती आणि असुरक्षिततेची भावना व्यक्त होत आहे.


याबाबत मयताचे पुत्र मंगेश रामचंद्र महाडीक (वय ४६, सध्या रा. सावर्डे, ता. चिपळूण) यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्याच्या माखजन दूरक्षेत्राला कळवले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
या प्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक चौकशीत मानसिक तणाव आणि दीर्घकाळ जाणवणारे एकाकीपण हे या घटनेमागील प्रमुख कारण असल्याचे समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *