चिपळूण : मासे पकडताना पाण्यात पडल्याने 65 वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील ताम्हणमळा-देऊळवाडी येथील ६५ वर्षीय वृद्धाचा मासेमारी करताना पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. वसंत विठ्ठल कातळकर (वय ६५, रा. ताम्हणमळा देऊळवाडी, ता. चिपळूण) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ६ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास कापसी नदीवरील गळवणी फाट्याजवळील पुलाखाली घडली. वसंत कातळकर हे एकटेच मासे पकडण्यासाठी नदीकाठी गेले होते. मासेमारी करत असताना त्यांचा तोल जाऊन ते पाण्यात पडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

या प्रकरणी सरेंद्र राजाराम कातळकर यांनी दिलेल्या माहितीवरून चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ३१/२०२६ नुसार नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे ताम्हणमळा-देऊळवाडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून कातळकर यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *